dr.satish best website design developer

कानडेवाडी ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

ग्रामपंचायत ही सन 1957 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंचाची कामे -

 • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
 • गावातील तंटे निर्विवाद मिटवणे.
 • गावाची स्वच्छता राखणे.
 • वेळोवेळी ग्रामसभा घेणे. (एका वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायदयाअंतर्गत बंधनकारक आहे)
 • गावात आवास करत असल्या बाबतचा दाखला देणे (रहिवासी दाखला) इ.

सदस्यांची कामे -

 • सदस्यांनी आप-आपल्या वार्डाकडे नियमित लक्ष दयावे.
 • वार्डातील समस्या आपल्या पध्दतीने सोडवाव्यात.
 • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
 • वार्डाची स्वच्छता राखणे. इ.

ग्रामसेवकाची कामे -

 • गावात आलेल्या शासकीय अधिका-याचे आदरातिथ्य करणे.
 • गावामध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी कार्यक्षम असणे.
 • गावकरी मंडळींना नव-नविन सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन करणे. इ.

तलाठीचे कामे -

 • सातबारा उतारा देणे.
 • पंचनामा करणे.
 • रहिवासी दाखला देणे.
 • इतर शेती संबंधी कागदपत्र.
 • जमिन नावे लावणे. इ.

पोलिस पाटीलचे कामे -

 • गावात सु-व्यवस्था ठेवणे.
 • पोलिस पाटील यांचे कडील रहिवासी दाखला देणे. इ.

ग्रामपंचायतीची कामे :

 • गावात रस्ते बांधणे.
 • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
 • दिवाबत्तीची सोय करणे.
 • जन्म,मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे.
 • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
 • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
 • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
 • शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे.
 • रोजगार, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
 • गावाचा बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवणे.

 ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :

 • ग्रामस्वच्छता अभियान 
 • निर्मल ग्रामयोजना 
 • यशवंत ग्राम समृद्धी योजना 
 • स्वजलधारा योजना 
 • महात्मा फुले संस्कार वाहिनी केंद्र  

 ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :

 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार 
 • तंटामुक्त गाव पुरस्कार
 • हागणदारी मुक्त गाव पुरस्कार 

ADDRESS
Kandewadi Grampanchayat
A/p Kanadewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9923876386
Office : 9923582539