dr.satish responsive layout developer

गावातील विविध सुविधा

शैक्षणिक सुविधा :

गावामध्ये नर्सरी ते ज्युनिअर कॉलेज पर्यंत शिक्षणाची सोय आहे.

 • प्राथमिक शाळा - विद्यामंदिर कानडेवाडी, 
 • माध्यमिक शाळा - राजर्षी शाहू हायस्कूल, कानडेवाडी
 • उच्च माध्यमिक - राजा शिव छत्रपती ज्युनिअर कॉलेज

दुध संस्था :

गावामध्ये कृषीपुरक जोडधंद्यांमध्ये दुग्धउत्पादन हा प्रमुख व्यवसाय असून गावामध्ये चार दुध संस्था आहेत.

दूध संस्था व त्यांची नावे -
 • श्रीकृष्ण सहकारी दुध संस्था कानडेवाडी
 • कै. इंदुमतीदेवी कुपेकर सह. दुध संस्था कानडेवाडी
 • कै.रखमाजीराव कुपेकर सह. दुध संस्था कानडेवाडी
 • श्री.शिवशक्ती सह. दुध संस्था कानडेवाडी

आरोग्य सुविधा :

गावामध्ये आरोग्याच्या सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे.

महिला बचत गट :

महिलांचा विकास करण्यासाठी गावामध्ये पाच महिला बचत गट निर्माण केले असून त्यांमार्फत महिलांचे आर्थिक, सामाजिक सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे.

महिला बचत गट व त्यांची नावे -
 • श्री. महालक्ष्मी महिला बचत गट कानडेवाडी
 • हिरकणी महिला बचत गट कानडेवाडी
 • कलावतीदेवी महिला बचत गट कानडेवाडी
 • ताराराणी महिला बचत गट कानडेवाडी
 • भैरवनाथ महिला बचत गट कानडेवाडी

तरूण मंडळे :

तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत. यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात.

तरूण मंडळ व त्यांची नावे -
 • सर सेनापती प्रतापराव गुर्जर तरुण मंडळ कानडेवाडी
 • व्हिक्टोरिअस क्रिडामंडळ कानडेवाडी
 • भैरवनाथ तरुण मंडळ कानडेवाडी
 • जयभिम तरुणमंडळ कानडेवाडी

वित्तिय संस्था :

ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये श्री महादेव वि.का.स. सेवा संस्था, श्री शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कानडेवाडी कार्यरत आहेत. 

ADDRESS
Kandewadi Grampanchayat
A/p Kanadewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9923876386
Office : 9923582539