dr.satish drag and drop website developer

आमचं गाव :

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे कानडेवाडी. माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांची जन्मभुमी आणि कर्मभुमी म्हणजे कानडेवाडी. 

आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना सन 1957 रोजी झाली असून ग्रामपंचायतीचे सात सदस्य आहेत. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 250 असून गावाची लोकसंख्या 1036 इतकी आहे.

कृषी आणि गाव :

गावाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी आणि कृषीपुरक जोडधंद्यांशी निगडीत आहे. गावातील बागायती कृषी क्षेत्र हे 72 हेक्टर 32 गुंठे इतके असून जिरायती कृषी क्षेत्र 364 हेक्टर इतके आहे. 

प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, नाचना, भुईमूग यांचे उत्पादन घेतले जाते तर सिंचनासाठी गावाला घटप्रभा नदीचा आधार आहे.

गावातील मंदिरे :

गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ हे असून भैरवनाथ यात्रा, मरगुबाई यात्रा आणि भावेश्वरी यात्रा गावात उत्साहात साजरी केली जाते. गावामध्ये अध्यात्म आणि मन:शांतीसाठी श्री भैरवनाथ मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, मरगुबाई मंदिर, दत्त मंदिर आणि भावेश्वरी मंदिर आहे.

हनुमान मंदिर

प्रतापराव गुर्जर स्मारक

प्रतापराव गुर्जर स्मारक :

गावाजवळचं छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती 'प्रतापराव गुर्जर' यांचे स्मारक आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले होते. ही लढाई कानडेवाडी-नेसरी खिंडीमध्ये झाली होती.

'म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे असे हे स्मारक आहे.

ADDRESS
Kandewadi Grampanchayat
A/p Kanadewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9923876386
Office : 9923582539